हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘जगभरात हिजाबला विरोध, तर भारतात हिजाबसाठी आंदोलन !’

मुंबई – काही मासांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणार्या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ? भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो. एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाबचे समर्थन करणारे आता कुठे आहेत ? असा प्रश्न दुर्ग, छत्तीसगड येथील अधिवक्त्या रचना नायडू यांनी उपस्थित केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘जगभरात हिजाबला विरोध तर भारतात हिजाबसाठी आंदोलन !’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.
हिजाबचा विषय भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला गेला ! – तान्या, संपादिका, ‘संगम टॉक्स्’ यू ट्यूब चॅनेल

हिजाबची सक्ती इस्लामी देशांचा राजकीय कार्यक्रम आहे. काही मासांपूर्वी आपल्या देशातील काही राज्यांतील शाळांमध्ये हिजाबला विरोध झाला, म्हणून मुसलमान मुलींनी आंदोलन केले. या घटनेचे व्हिडिओ नियोजितबद्ध पद्धतीने लोकांपर्यंत पोचवण्यात आले. शाळेमध्ये हिजाब घालूनच यावे, या मागणीसाठी या शाळेतील मुलींना न्यायालयीन खटले लढण्यासाठी अधिवक्तेही सहजपणे मिळाले आणि ते सर्वोच्च न्यायालयात पोचले, तसेच त्यांना मुसलमान संघटनांचे समर्थनही मिळाले. हिजाबचा विषय आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला गेला.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..
🟢 विश्व में हिजाब का विरोध, पर भारत में हिजाब हेतु आंदोलन !
______________________
धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

पारशी बांधवांचा पर्शिया देश इराण झाला. याच इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहे. काही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेत. नारीशक्ती एकत्रित आली, तर काय होऊ शकते, हे जगभरातील महिलांकडून हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहे. इराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्याचार होत आहेत, ज्याला आता विरोध होत आहे. ‘हिंदु धर्म महिलांना देवीसमान मानतो’, या धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर महिला अवश्य सुरक्षित रहातील.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतात त्याविषयी आकांडतांडव करणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ? |
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती