मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !

हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिखांचे मौन !

काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये ! याचा एकाही इस्लामी देशाने निषेध किंवा विधान केलेले नाही. इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश तसेच भारतातील मुसलमानही कधी करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे !

वाई (जिल्हा सातारा) येथील नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे ! – शिवसेना

वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सामाजिक माध्यमांवरून ‘अग्नीपथ योजने’च्या विरोधात अपसमज पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार ! – अजयकुमार बंसल, जिल्हा पोलीस अधीक्षक

भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरती होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘अग्नीपथ योजना’ चालू करण्यात आली आहे. या योजनेला काही राज्यांमधून विरोध दर्शवला जात आहे.

डोंबिवली येथे उपाहारगृहात तोडफोड !

मानपाडा रस्त्यावरील शारदा मुका अंबिका उपाहारगृहामध्ये रात्री १५ ते २० जणांच्या टोळक्याने घुसून तोडफोड केली. तसेच उपाहारगृहाचे मालक दयानंद शेट्टी यांच्यासह रोखपाल आणि कामगार यांना पुष्कळ मारहाण केली.

म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या !

उच्चशिक्षित व्यक्तींचे मनोबल अल्प असणे समाजासाठी चिंताजनक आहे. समाजाचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अत्यावश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! सरकारने आतातरी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत !

खलिस्तानवादी यावर गप्प का ?

तालिबानच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत. काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांमध्ये एकूण १४० ते १५० शीख रहातात, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली.

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.

महिला वारकऱ्यांची कुचंबणा !

महिलांसाठी न्हाणीघरांची आणि अधिकाधिक फिरत्या स्वच्छतागृहांची सोय, स्तनदा मातांसाठी तात्पुरता निवारा शेड, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावल्यास महिलांची वारीही सुखकारक होईल !

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले !