डोंबिवली येथे उपाहारगृहात तोडफोड !

प्रतिकात्मक छायाचित्र

डोंबिवली – मानपाडा रस्त्यावरील शारदा मुका अंबिका उपाहारगृहामध्ये रात्री १५ ते २० जणांच्या टोळक्याने घुसून तोडफोड केली. तसेच उपाहारगृहाचे मालक दयानंद शेट्टी यांच्यासह रोखपाल आणि कामगार यांना पुष्कळ मारहाण केली. क्षुल्लक कारणातून हा प्रकार घडला. विजय जुगदर, व्यंकटेश पंडित यांच्यासह टोळक्याने उपाहारगृहामध्ये घुसून तोडफोड केली आणि मारहाण करत लूटमार केली, असा आरोप मालक दयानंद शेट्टी यांनी केला आहे. विजय याने त्याच्या समर्थकाला उपाहारगृहामध्ये पाठवून खाद्यपदार्थाची पाकिटे बांधून देण्यास सांगितली; परंतु रोखपालाने अगोदरच्या देयकाची रक्कम मागितली. त्याचा राग आल्याने विजय २० जणांना घेऊन तेथे गेला. त्याने रोखपाल आणि कामगार यांना मारहाण केली. तसेच मालक दयानंद शेट्टी यांच्यावर आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले.