म्हैसाळ (जिल्हा सांगली) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

मिरज (जिल्हा सांगली) – तालुक्यातील म्हैसाळ येथील नरवाड रस्त्यावरील अंबिकानगरमधील चौंडजे मळा आणि उपाहारगृह राजधानी कॉर्नर, अशा २ ठिकाणी एकाच कुटुंबातील ९ जणांनी विषप्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. पशूवैद्य माणिक वनमोरे आणि त्यांचे भाऊ शिक्षक पोपट वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुले यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत. या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. येथील शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका आहे; मात्र अद्याप अधिकृत माहिती नाही. या घटनेने म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरून गेला आहे.

संपादकीय भूमिका

  • आत्महत्या म्हणजे मानसिक दुर्बलतेचे लक्षण !
  • उच्चशिक्षित व्यक्तींचे मनोबल अल्प असणे समाजासाठी चिंताजनक आहे. समाजाचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना साधना शिकवणे अत्यावश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! सरकारने आतातरी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत !