(म्हणे) ‘राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ शब्द वगळण्याची मागणी देशद्रोही अन् घटनाविरोधी !’

श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य न करता ‘बाबरी पुन्हा उभारणार’, असा ६ डिसेंबरला सार्वजनिक प्रसार करणाऱ्या ‘पी.एफ.आय.’ने हिंदूंना घटनाविरोधी म्हणणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या… !

राणी लक्ष्मीबाईंचा लढाऊ बाणा आजच्या युवतींमध्ये यायला हवा ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त शाहूपुरी येथील हुतात्मा स्मारक ते राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर धावडशी ग्राम, अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

पुणे येथे ‘वारकरी धारकरी संगम सोहळ्या’चे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि शिवपाईक यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मागील ७ वर्षांपासून ही परंपरा पुन्हा चालू केली आहे. लाखो धारकरी प्रत्येक वर्षी तोच आशीर्वाद घेण्यासाठी जातात.

आषाढी वारीमध्ये मूलभूत सुविधांसाठी राज्यशासनाकडून ९ कोटी रुपयांच्या निधीची मान्यता

आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्यांसह मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते.

अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजलि योग समितीकडून योग शिबिराचे आयोजन !

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वसिद्धतेनिमित्त पतंजलि योग समिती, रायगडने १९ जून या दिवशी येथील सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळाच्या ठिकाणी योग शिबिर आयोजित केले होते.

३० वर्षांपूर्वी भाडेकरार संपूनही अभिनेते शाहरुख खान यांचा बंगला सरकारी भूमीवर !

अभिनेते शाहरुख खान यांचा ‘मन्नत’ हा बंगला सरकारी भूमीवर असून वर्ष १९८१ मध्येच त्याचा करार संपला आहे, तो पुन्हा करण्यात आलेला नाही, असा आरोप संभाजीनगरचे कन्नड मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

आर्द्रता, पंचामृत आणि भाविकांचा चरणस्पर्श यांमुळे मूर्तींची २५ वर्षांतच १.२५ मि.मी.पर्यंत झीज !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचीही झीज झाल्याचे आढळले !

उपचार विनामूल्य असूनही ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील लाभार्थ्यांकडून काही रुग्णालयांनी १५ कोटी रुपये उकळले !

लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, याची माहिती मिळत नाही. पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर परवाना रहित करण्यासमवेत फौजदारी कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत !

आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जून या दिवशी झाले. २१ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे