वाई (जिल्हा सातारा) येथील नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे ! – शिवसेना

सातारा, २० जून (वार्ता.) – वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, वाई शहर शाखाप्रमुख गणेश जाधव आणि कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी किरण मोरे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, पुलाला शहराच्या लौकिकास साजेसे नाव असावे, अशी वाईतील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे या पुलाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे. तसेच या पुलाच्या उद्घाटनासाठी पालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचारण करावे.