हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आल्यासच धर्माचे रक्षण होईल ! – कालीचरण महाराज
कालीचरण महाराज पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले नाही, तर सर्व जातींच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
इलॉन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याच्या करारावर आणली स्थगिती !
यामागे सामाजिक माध्यमावर साधारण ५ टक्के खोटी खाती असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. अशी खाती बंद करण्याची मस्क यांची पूर्वीपासून भूमिका आहे. ट्विटरबरोबर झालेल्या कराराचा मस्क पुनर्विचार करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
जयपूर, राजस्थान येथील शिवभक्त पू. वीरेंद्र सोनी (वय ८७ वर्षे) यांचा देहत्याग
पू. वीरेंद्र सोनी हे घरी राहूनच भाव-भक्तीने साधना करत. त्यांनी धर्मग्रंथांचे वाचन करून त्यांना आतून ईश्वराकडून मिळणाऱ्या ज्ञानाच्या आधारे लिखाण केले आहे. त्यांची भगवान शिवावर अचल श्रद्धा होती.
हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखले, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी !
अलीगड येथील जामा मशीद सार्वजनिक भूमीवर बांधण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड !
अवैध मशीद पाडण्याची माजी महापौरांची मागणी
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !
पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या २२ जणांना प्रत्येकी ५ वर्षांचा कारावास
पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता.
औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणे अत्यंत घातक ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज
एम्.आय.एम्.चे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या संभाजीनगर दौऱ्याचा प्रारंभ औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेऊन केला. त्यांनी कबरीवर चादर चढवली.
श्रीलंकेतील स्थिती अधिक बिकट होईल ! – पंतप्रधान विक्रमसिंघे
श्रीलंकेला इंधनाचा तुटवडा भेडसावत असून गेल्या काही आठवड्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. यावरून श्रीलंकन जनतेकडून अनेक हिंसात्मक कारवाया करण्यात येत आहेत.