अलीगड येथील जामा मशीद सार्वजनिक भूमीवर बांधण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड !

अवैध मशीद पाडण्याची माजी महापौरांची मागणी

अलीगड येथील जामा मशीद

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील जामा मशीद सार्वजनिक जागेवर बांधण्यात आली आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. ‘या मशिदीच्या जागेचा मालकी अधिकार कुणाकडेही नाही’, असे यात म्हटले आहे. यासह या मशिदीच्या बांधकामाच्या संदर्भात नगरपालिकेकडेही कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याविषयी भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर शकुंतला भारती यांनी म्हटले की, जर मशीद सार्वजनिक भूमीवर आहे, तर ती अवैध असून ती पाडली पाहिजे.

१. २३ जून २०२१ या दिवशी माहिती अधिकार कार्यकर्ते केशव देव यांनी अलीगड नगरपालिकेकडे या मशिदीविषयी विविध माहिती मागितली होती. त्यात वरील माहिती देण्यात आली.

२. केशव देव यांनी प्रशासनाला पत्र लिहून सांगितले की, ही मशीद सार्वजनिक भूमीवर बांधण्यात आल्याने ती अवैध आहे. त्यामुळे ती हटवण्यात यावी.

३. याविषयी शहर मुफ्ती (इस्लामी कायद्यांचा जाणकार) यांचे प्रवक्ते गुलजार अहमद यांनी सांगितले की, जामा मशिदीची नोंद उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाकडे आहे.

४. जामा मशिदीचे मुतवल्ली (मशिदीचे व्यवस्थापक) हाजी सूफियान यांनी सांगितले की, जामा मशीद ३०० वर्षे जुनी असून त्याचे बांधकाम मोगल काळात करण्यात आले आहे

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !