औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणे अत्यंत घातक ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेताना

नाशिक – एम्.आय.एम्.चे तेलंगणामधील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या संभाजीनगर दौऱ्याचा प्रारंभ औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेऊन केला. त्यांनी कबरीवर चादर चढवली. हा प्रकार समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी अत्यंत घातक आहे. अशांची मानसिकता लक्षात घ्या. हिंदु बांधवांनो, वेळीच जागे व्हा !, अशी प्रतिक्रिया येथील महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली आहे.