श्रीलंकेतील स्थिती अधिक बिकट होईल ! – पंतप्रधान विक्रमसिंघे

श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान राणील विक्रमसिंघे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान राणील विक्रमसिंघे यांनी देशाच्या आर्थिक दिवाळखोरीच्या स्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सध्या देशात असलेली स्थिती अधिक बिकट होईल. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. त्यांनी श्रीलंकन जनतेला आश्वस्त करत म्हटले की, श्रीलंकेची अर्थव्यवस्था जरी कोलमडलेल्या स्थितीत असली, तरी मी सर्व गोष्टी सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करीन.

श्रीलंकेला इंधनाचा तुटवडा भेडसावत असून गेल्या काही आठवड्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. यावरून श्रीलंकन जनतेकडून अनेक हिंसात्मक कारवाया करण्यात येत आहेत. यांवर आळा घालण्यासाठी विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानपदावर ते सहाव्यांदा आरूढ झाले आहेत.