रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश

बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !

अजमेर (राजस्थान) येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्गा पूर्वी मंदिर होते ! – महाराणा प्रताप सेना

अजमेर येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हे पूर्वी मंदिर होते. दर्ग्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर हिंदु धर्माशी संबंधित चिन्ह आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने येथे सर्वेक्षण करावे, अशी मागणी महाराणा प्रताप सेनेने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून केली आहे.

चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मीठ असल्याचे सांगून इराणमधून आयात केलेले ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरामधील एका मालवाहू नौकेवरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावामुळे पाक सरकारने ३० रुपयांनी वाढवले पेट्रोल-डिझेल यांचे दर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७ दिवस चर्चा केल्यानंतर पाकला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक सरकारने नाणेनिधीच्या सांगण्यावरून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी (पाकिस्तानी रुपये) वाढ केली आहे.

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाची मुसलमानांकडून हानी ! – हिंदु पक्ष

ज्ञानवापी प्रकरणाच्या २६ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यांचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने ३० मे या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी तो पूर्ण करण्यात येणार आहे.

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !

बंगालमधील विद्यापिठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असतील ‘कुलपती’ !

ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?