देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

(‘पॅरोल’ म्हणजे बंदिवानाला विशिष्ट मुदतीसाठी काही अटींवर मुक्त करणे)

नवी देहली – येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांवर बंदुक रोखणार्‍या शाहरुख पठाण याला कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर त्याच्या घराजवळ मुसलमानांनी एखाद्या विजेत्यासारखे त्याचे भव्य स्वागत केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पठाण याला २३ मे या दिवशी ४ घंट्यांसाठी पॅरोल वर सोडण्यात आले होते. त्याचे वडील आजारी असून त्यांना भेटण्यासाठी त्याला सोडण्यात आले होते.

सौजन्य न्युज 24

संपादकीय भूमिका

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?