अजमेर (राजस्थान) येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्गा पूर्वी मंदिर होते ! – महाराणा प्रताप सेना

दर्ग्यामध्ये हिंदूंचे धार्मिक चिन्ह असल्याने याचे सर्वेक्षण करण्याची मागणी

अजमेर (राजस्थान) – येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हे पूर्वी मंदिर होते. दर्ग्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर हिंदु धर्माशी संबंधित चिन्ह आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने येथे सर्वेक्षण करावे, अशी मागणी महाराणा प्रताप सेनेने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून केली आहे. दुसरीकडे दर्ग्याच्या खादिम समितीने ‘येथे हिंदु धर्माशी संबंधित कुठलेही चिन्ह नाही. उलट हिंदु आणि मुसलमान अशा दोन्ही समाजांचे कोट्यवधी लोक दर्ग्यात येतात’, असे म्हटले आहे. महाराणा प्रताप सेनेच्या मागणीनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सौजन्य न्युज आपतक

खादिम समितीचे अध्यक्ष मोईन चिश्ती म्हणाले की, हा दर्गा ८५० वर्षांपासून आहे. आजवर अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्‍न उपस्थित झालेला नाही. आज देशात पूर्वी कधीही नव्हते, असे विशिष्ट वातावरण सिद्ध झाले आहे.

भाजपकडूनही सर्वेक्षणाची मागणी

महाराणा प्रताप सेनेने अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केल्यानंतर भाजपनेही ही मागणी केली आहे. राजस्थानचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी ही मागणी केली आहे.