ज्ञानवापी खटल्यावर मुसलमान पक्षाकडून युक्तीवादाला प्रारंभ
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी प्रकरणाच्या २६ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यांचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने ३० मे या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी तो पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हिंदु पक्षाकडून त्याला उत्तर देण्यात येणार आहे.
सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाचे अधिवक्ता अभयनाथ यादव यांनी सांगितले, ‘मशिदीतील शिवलिंगाचे अस्तित्व कथित असून ते अद्याप सिद्ध झालेले नाही. अफवांमुळे अशांतता निर्माण होते. त्यामुळे अस्तित्व सिद्ध होईपर्यंत तेथे पूजा करू नये.’ त्याच वेळी हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी न्यायालयात सांगितले, ‘ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची मुसलमानांकडून हानी करण्यात आली आहे. शिवलिंगाला छेद पाडून त्याच्यावर एक चकती बसवण्यात आली होती. ती आता त्यांच्या ‘स्टोअर रूम’मध्ये आहे.
(सौजन्य : IndiaTV)
‘अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटी’च्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादात म्हटले आहे की, हिंदू बाजूचे हे प्रकरण चालू ठेवण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरी प्रक्रिया संहितेतील आदेश ७, नियम ११ अन्वये ते रहित केले जावे.
काशी विश्वनाथ मंदिराच्या माजी महंतांचा अन्नत्यागकाशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी अन्नत्याग केला आहे. ‘जोपर्यंत ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही’, असे डॉ. तिवारी यांनी सांगितले. |