जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये मशीद समितीचा फतवा

केरळमध्ये बीमपल्ली जमात मशीद समितीने काढलेला फतवा

थिरूवनंतरपूरम् (केरळ) – येथील बीमपल्ली जमात मशीद समितीने फतवा काढला आहे. ‘जिहादी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढणार असून त्याला हिंदु व्यापाऱ्यांनी सहकार्य केले नाही, तर त्यांना लक्ष्य केले जाईल’, असे या फतव्यात म्हटले आहे. व्यापाऱ्यांनी नुसती दुकाने बंद करणे पुरेसे नसून त्यांना केंद्र सरकारच्या विरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनांत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. ‘आंदोलनांच्या वेळी दुकाने चालू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. ‘हिंदु पोस्ट’ संकेतस्थळाने ने हे वृत्त प्रसारित केले आहे.

१. केंद्र सरकार समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार आहे. हा कायदा आणू नये, यासाठी केरळमध्ये जिहादी संघटना राजभवनाच्या परिसरात मोर्चा काढणार आहेत. ‘या मोर्च्याला व्यापाऱ्यांनी बंद पाळून सहकार्य करावे’, असे या जिहादी संघटनांना वाटते. ‘हा जिहादी संघटनांच्या आर्थिक जिहादचा भाग आहे’, असे हिंदूंकडून सांगितले जात आहे.

२. ‘केरळ व्यापारी व्यावसायी एकोपना समिती’ या व्यापाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेने जिहादी संघटनांशी हातमिळवणी केली आहे. हिंदूबहुल भागांत मुसलमानांना व्यापार करता यावा, यासाठी ही व्यापारी संघटना कार्य करते. त्यासाठी हिंदूबहुल भागांत भाडेतत्त्वावर जागा घेतली जाते. संबंधित मुसलमान व्यापाऱ्याचा जम बसल्यावर त्या परिसरात मोठी किंमत देऊन अधिक जागा विकत घेतली जाते. असे करून मुसलमान त्या परिसरात शिरकाव करतात आणि तो भाग मुसलमानबहुल बनतो. हिंदु व्यापाऱ्यांना संपवण्याच्या उद्देशाने ‘केरळ व्यापारी व्यावसायी एकोपना समिती’ संघटना कार्यरत असल्याचा आरोप केला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • केरळ हे ‘दुसरे काश्मीर’ झाले असून तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत !
  • केरळमध्ये हिंदु व्यापाऱ्यांमध्ये कशा प्रकारे दहशत निर्माण केली जात आहे, हे जाणा !
  • केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !