चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

(द्रमुक : द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – भाजपचे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती शाखेचे चेन्नई जिल्हाध्यक्ष बालचंद्रन् यांची २४ मे या दिवशी येथील चिंताद्रिपेट भागात ३ अज्ञातांनी चाकूचे वार करून हत्या केली. त्यांना यापूर्वीच ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना सरकारने एक सुरक्षारक्षक दिला होता. तो चहा पिण्यासाठी गेला असता बालचंद्रन् यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली आहे.

तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी ट्वीट करून सरकारवर या प्रकरणी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, गेल्या २० दिवसांत शहरात १८ हत्या झाल्या आहेत. यातून हे शहर एक प्राणघातक शहर झाले आहे. येथील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिका

तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !