मीठ असल्याचे सांगून इराणमधून आयात केलेले ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

कर्णावती (गुजरात) – महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरामधील एका मालवाहू नौकेवरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले.

विशेष म्हणजे मीठ असल्याचे सांगून याची आयात करण्यात आली होती. वर्ष २०२१-२२ मध्ये या संचालनालयाने देशभरातून ३२१ किलो कोकेन जप्त केले होते. याचे आंतरराष्ट्रीय बाजारात ३ सहस्र २०० कोटी रुपये मूल्य आहे.