बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग कोसळला !
समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचा मोठा भाग २७ एप्रिलच्या रात्री १ ते २ च्या दरम्यान कोसळला. एक मोठा गर्डर ८० फुटांवरून खाली कोसळला. काम चालू असतांना कामगार तेथून बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली.