‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात पुढे आले आहे.

श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीवरील ३ भोंगे हटवले !

काही दिवसांपूर्वीच करण्यात आला येथील श्रीकृण मंदिरांवरील भोंग्याचा आवाज न्यून !

अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करा ! – समस्त ब्राह्मण पुरोहित सेवा संस्था

आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्म देवता, पुरोहित आणि विवाहातील विधी यांची केलेली टिंगलटवाळी याविरोधात त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे निवेदन समस्त ब्राह्मण पुरोहित सेवा संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

अमोल मिटकरींविरोधात नवी मुंबईतील परशुराम सेवा संघाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

हिंदु धर्मातील पुरोहित वर्गाविरुद्ध, तसेच हिंदु विवाहपद्धती विरोधात अश्लाघ्य वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात मानहानी, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद…

देवगड ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे नागरिकांची परवड !

देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात जुलै २०२० मध्ये बसवण्यात आलेली रक्त साठवणुकीची यंत्रणा १८ मासांनंतरही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ कि ‘अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन’ ?

ज्या शासनकर्त्यांचा साहित्याशी विशेष काही संबंध नाही, ज्यांचे मराठीसाठी विशेष काही योगदान नाही, अशा राजकीय लोकांची नावे देऊन साहित्य महामंडळ नेमके काय साध्य करत आहे ?

कामकाजात मराठीचा उपयोग होत नसल्याच्या मराठी भाषा विभागाकडे अनेक तक्रारी; मात्र कारवाईचे अधिकार नसल्याने अडचण !

‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर मराठी भाषेविषयी आलेल्या तक्रारींवरून मराठी भाषा विभागाकडून संबंधित विभागाला पत्र पाठवले जाते; मात्र त्यावर काही कारवाई झाली आहे का ? याविषयी संबंधित विभागांकडून कोणताही प्रतिसाद येत नाही..

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक !

‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांना २४ एप्रिल या दिवशी खार येथील पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मलिक यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.