काही दिवसांपूर्वीच करण्यात आला येथील श्रीकृण मंदिरांवरील भोंग्याचा आवाज न्यून !
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. आता येथील ईदगाह मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवान न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानंतर शुक्रवार, २२ एप्रिलला नमाजपठण ध्वनीक्षेपकाविनाच करण्यात आले. येथील भोंगे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
याविषयी मशिदीच्या व्यवस्थापन समितीचे सचिव तनवीर अहमद यांनी सांगितले की, मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत आणि केवळ एक भोंगा ठेवण्यात आला आहे. त्याचा आवाज न्यून करण्यात आला असून तो मशिदीबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक