भाजपचे किरीट सोमय्या यांची अटक तूर्तास टळली !

आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले.

रुबी हॉल क्लिनिकची नोंदणी ६ मास रहित !

कोल्हापूर येथील महिलेला दलालाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे आमीष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली होती. हे शस्त्रकर्म रुबी हॉलमध्ये झाले होते. ‘रुग्णाशी पत्नीचे नाते आहे’, असे सांगून हे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते.

कॉ. पानसरे यांची हत्या नेमकी कुणी केली ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात युक्तीवाद

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सोलापूर येथे सहस्रो कुटुंबांनी केले हवन !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सोलापूर येथे सहस्रो कुटुंबातील सदस्यांनी श्रीरामरक्षा स्तोत्रासह देशी गायीच्या गोवऱ्या, गायीचे तूप, अक्षता आणि कापूर यांच्या साहाय्याने हवन केले.

शिखांमधील वाढता हिंदुद्वेष !

शीख समुदायाचा होत असलेला बुद्धीभेद रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक ! खलिस्तानी आतंकवाद मोडून काढण्यासह शीख समुदायामध्ये जे वैचारिक प्रदूषण पसरवण्यात आले आहे, ते रोखायला हवे. त्यासाठी आवश्यक त्या सर्वच व्यासपिठांवरून शीख आणि हिंदू यांचा गौरवशाली इतिहास त्यांना शिकवायला हवा. अखंड भारतासाठी हे आवश्यक आहे.

पोलिसी मनोवृत्ती !

‘धर्मांध दंगल घडवतील आणि ती रोखायची असेल, तर हिंदूंना नमते घेणे भाग पाडले पाहिजे’, अशी पोलिसांची कार्यपद्धत आखलेली दिसते. हिंदूंच्या विरोधात दबावतंत्र अवलंबून समाजाचे भले होणार नाही, तर धर्मांधांना वठणीवर आणून समाजात शांती नांदणार आहे. हे सत्य पोलीस स्वीकारत नसतील, तर ते त्यांना समजावून सांगण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य आहे.

मौलवींचा उद्दामपणा जाणा !

‘३ मे या दिवशीच काय, प्रलय जरी आला, तरी भोंगे काढणार नाही’, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगावातील मौलवींनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

‘हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्यामुळे त्यांचा हिंदु धर्मावरील विश्वास नाहीसा होतो, हे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आहे.’