
सातारा – श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते वेदशास्त्रसंपन्न श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले. या वेळी सनातन निर्मित ‘शिव’ हा ग्रंथ देऊन शास्त्रीजींचा सन्मान करण्यात आला.