फलकावर चुका लिहीत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आठवण होऊन फलकामध्ये पांडुरंगाचे अस्तित्व जाणवणे

एक दिवस मी आश्रमातील फलकावर चुका लिहीत होते. तेव्हा २ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या एका वृत्ताची मला आठवण झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले होते, ‘चुकांचा फलक, म्हणजे ‘श्री फलक’ आहे. फलकाच्या रूपात साक्षात् पांडुरंगच तिथे उभा असतो.’