शिखांमधील वाढता हिंदुद्वेष !

शिखांचा बुद्धीभेद करून त्यांना हिंदूंच्या विरोधात चिथावणाऱ्यांवर कारवाई करा !

पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये एका शीख तरुणाने भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर चप्पल ठेवल्याने तेथे उपस्थित हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. धर्मांधांकडून विविध माध्यमांद्वारे हिंदूंच्या देवतांची विटंबना केली जाते. या गोष्टी हिंदूंना ज्ञात आहेत. धर्मांधांना बालपणापासून हिंदूंचा दुःस्वास करण्यास शिकवले जाते. हिंदू मूर्तीपूजक आहेत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. त्यामुळे धर्मांधांना संधी मिळाल्यावर ते हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करतात. या पाठोपाठ आता शीखही हिंदूंच्या देवतांचा अवमान करू लागले आहेत. गुरुदासपूरमधील या घटनेकडे दुर्लक्षून चालणार नाही. शिखांमध्ये हिंदूंविषयी एवढा द्वेष का निर्माण झाला ? स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक शिखांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक क्रांतीकारी शिखांनी दिलेला क्रांतीकारी लढा कुणीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शीख आणि हिंदु क्रांतीकारकांनी संघटितपणे ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. हिंदूंचे नेहमीच शिखांशी सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत, मग आताच काय झाले ?

एका शिखाकडून भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्तींवर चप्पल ठेवल्याचा प्रकार ही हिंदुद्वेषाची परिसीमा आहे. शिखांचा इतिहास पाहिल्यास किंवा त्यांच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केल्यास त्यात हिंदुद्वेषाला थारा नाही. असे असले, तरी मागील काही वर्षांमध्ये बहुतांश शिखांमध्ये हिंदुद्वेष वाढला आहे. यास खलिस्तानी आतंकवादी चळवळ कारणीभूत आहे. या खलिस्तान्यांना पाकची फूस आहे. पराक्रमी आणि इस्लामी आक्रमकांसमोर न झुकणाऱ्या शिखांचा बुद्धीभेद झाल्यामुळे त्यांचे होत असलेले अधःपतन समजून घ्यायला हवे. ज्या इस्लामी आक्रमकांनी शिखांच्या धर्मगुरूंची क्रूरतेने हत्या केली, त्यांचेच वंशज असलेल्या इस्लामी जिहादी आतंकवाद्यांशी खलिस्तानी आतंकवाद्यांनी संधान साधले आहे. जे स्वतःच्या पूर्वजांचा इतिहास विसरतात, त्यांचे भविष्य अंधारमय असते. खलिस्तानान्यांचे तेच झाले आहे. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीत त्यांना आता हिंदूंचा अडसर वाटू लागला आहे. ‘स्वतःचा वेगळा धर्म’, ‘स्वतःची वेगळी संस्कृती’, असे त्यांना वाटू लागले आहे; मात्र त्यांची बिजे हिंदु धर्मात आहेत, हे ते विसरले आहेत किंबहुना जाणीवपूर्वक त्यांना ते विसरायला लावण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश शिखांना शत्रू हा मित्र वाटू लागला आहे, तर मित्र हा शत्रू वाटू लागला आहे. ही हिंदूंसाठी त्याहून अधिक अखंड भारतासाठी धोक्याची घंटा आहे. येणाऱ्या काळात या संदर्भात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असेल. शीख समुदायाचा होत असलेला बुद्धीभेद रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. खलिस्तानी आतंकवाद मोडून काढण्यासह शीख समुदायामध्ये जे वैचारिक प्रदूषण पसरवण्यात आले आहे, ते रोखायला हवे. त्यासाठी आवश्यक त्या सर्वच व्यासपिठांवरून शीख आणि हिंदू यांचा गौरवशाली इतिहास त्यांना शिकवायला हवा. अखंड भारतासाठी हे आवश्यक आहे.