धर्मांधांना मोकाट सोडणारे आणि हिंदूंवर दबाव आणणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?
धारावी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘वज्रदल’ या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘हिंदू पलायन – हिंदू घटा.. देश बटा’, असे लिहिलेला फलक ‘धर्मांधांचा विरोध होईल’, या भीतीने पोलिसांनी झाकायला लावला. फलक झाकून ठेवेपर्यंत पोलिसांनी शोभायात्रा रोखून धरली. धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंना पलायन करावे लागत आहे, हे सत्य आहे. ते कुणीही नाकारू शकत नाही. उलट पोलिसांनाच हे सत्य अधिक चांगले ठाऊक आहे. असे असतांनाही पोलीस त्यावर आक्षेप घेतात, हे संतापजनक होय. मुसलमानांना वाईट वाटेल; म्हणून त्यांचे मन राखण्यासाठी पोलीस पडती बाजू घेतात; मात्र एवढे करूनही ते त्यांच्या हातचा मार खातात. याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. असे असूनही पोलीस त्यांच्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून गळाभेट घेतात. त्याला विरोध झाल्यावर ‘रोजा-इफ्तारसारखे उपक्रम पोलीस आणि समाज यांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहेत’, असे पोलिसांकडून सांगितले जाते. हे कितपत खरे आहे ? असा पोलिसांना अनुभव आला असेल, तर त्यांनी तो उघडपणे सर्वांना सांगावा.
देशभरात बहुतांश मुसलमानबहुल भागांत चोरांना पकडायला गेल्यावर तेथील जमावाकडून पोलीस मार खाऊन येतात. स्वतःची एवढी नाचक्की होत असतांनाही पोलिसांना त्याचे काहीही वाटत नाही, हे लज्जास्पद होय. असे पोलीस मात्र हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात. धारावी येथील घटनेत हेच दिसून आले. फलकावर भारताचा नकाशा छापून त्यावर मुसलमानबहुल झालेली भारताची राज्ये हिरव्या रंगाने दाखवण्यात आली होती. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? ‘देशातील ७७५ पैकी १०२ जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत’, असे केंद्र सरकारनेच सर्वाेच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे हे सत्य आहे; मात्र मुसलमानांच्या लांगूलचालनापायी पोलिसांना हे सत्य उघड होऊ द्यायचे नाही. असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
‘धर्मांधांच्या कलाने घेतले, त्यांना गोंजारले, तर ते शांत रहातील, हिंसक होणार नाहीत’, अशी जी शिकवण पोलिसांना दिली जाते, तीच अयोग्य आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. धर्मांधांच्या कलाने घेत गेले, तर ते शांत होत नाहीत, तर उद्दाम होऊन दुपटीने समाजविघातक कारवाया करतात. धर्मांधांमध्ये दिवसेंदिवस जी कायदा हातात घेऊन कारवाया करण्याची मनोवृत्ती वाढीस लागली आहे, त्याला खरे तर पोलीस उत्तरदायी आहेत. त्यामुळे धारावी येथे पोलिसांनी केलेली कृती दुर्लक्षून चालणार नाही. ‘धर्मांध दंगल घडवतील आणि ती रोखायची असेल, तर हिंदूंना नमते घेणे भाग पाडले पाहिजे’, अशी पोलिसांची कार्यपद्धत आखलेली दिसते. हिंदूंच्या विरोधात दबावतंत्र अवलंबून समाजाचे भले होणार नाही, तर धर्मांधांना वठणीवर आणून समाजात शांती नांदणार आहे. हे सत्य पोलीस स्वीकारत नसतील, तर ते त्यांना समजावून सांगण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य आहे.