जर्मनी युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देणार

संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव संमत करून रशियन सैन्याला युक्रेनमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शैलजा फडके यांचे निधन !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शैलजा भालचंद्र फडके (वय ८७ वर्षे) यांचे त्यांच्या निवासस्थानी ३ मार्च २०२२ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

विधान परिषदेत सभापतींसह काही सदस्य मास्कविना उपस्थित !

विधीमंडळाच्या प्रांगणात आणि प्रत्यक्ष विधानभवनामध्येही अनेकांनी मास्क घातला नव्हता. अधिवेशनाच्या प्रारंभी कोरोनाची चाचणी करून ‘निगेटिव्ह’ अहवाल असलेल्यांनाच विधानभवनात प्रवेश देण्यात आला आहे.

‘बोरोसिल लिमिटेड’च्या श्रीमती किरण खेरूका (वय ८९ वर्षे) यांची सनातनच्या पनवेल, देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

‘बोरोसिल लिमिटेड’च्या श्रीमती किरण खेरूका यांनी सनातनच्या पनवेल येथील देवद आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत त्यांच्या नातेवाईक श्रीमती उषा शर्मा, तसेच सनातनच्या साधिका श्रीमती ललिता गोडबोले यासुद्धा उपस्थित होत्या.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या वतीने बलीदान मासास आरंभ !

गत वर्षापासून शिवप्रेमींनी धर्मवीर बलीदान मास पाळण्यास आरंभ केला आहे. या वर्षीही फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (३ मार्च ते १ एप्रिल २०२२) पर्यंत बलीदान मास पाळण्यात येणार आहे.

नवाब मलिक यांच्या ‘ईडी’च्या कोठडीत वाढ

मलिकांना कह्यात घेऊन चौकशी होणे अधिक आवश्यक आहे, असे संचालनालयाने सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ७ मार्चपर्यंत मलिक यांच्या कोठडीत वाढ केली आहे.

ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घ्या ! – सर्वोच्च न्यायालय

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे, तर स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील अडथळे ! – धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

विदर्भस्तरीय २ दिवसांचे साधनावृद्धी शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !

मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गोव्याची ‘वेश्याव्यवसायाचे एक प्रमुख केंद्र’, ही ओळख पुसली पाहिजे ! – ‘अन्याय रहित जिंदगी’ महिला संघटना

असे आवाहन करण्याची वेळ येऊ देणे, हीच शोकांतिका आहे ! पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली ज्यांनी गोव्याची अशी अपकीर्ती केली, त्यांना खडसावले पाहिजे !