बर्लिन (जर्मनी) – संयुक्त राष्ट्र महासभेने एक प्रस्ताव संमत करून रशियन सैन्याला युक्रेनमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. दुसरीकडे जर्मनीने युक्रेनला २ सहस्र ७०० क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.
१. युक्रेनमध्ये युद्धाच्या ८ व्या दिवशी रशियाच्या आक्रमणात खारकीव येथे ८ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
२. रशियाच्या नौदलाने युक्रेनच्या समुद्रात असलेल्या बांगलादेशी नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
३. संयुक्त राष्ट्र महासभेच्या माहितीनुसार १ मार्चपर्यंत युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणात ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे.
४. रशियाचे हवाई आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे युक्रेनच्या १५ शहरांना सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
५. युद्धामुळे युक्रेनमधून आतापर्यंत १० लाख लोकांनी बाहेर पडून शेजारीला देशांमध्ये आश्रय घेतला आहे. यांत विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.