नवाब मलिक यांच्या ‘ईडी’च्या कोठडीत वाढ

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि नवाब मलिक

मुंबई – अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या ‘ईडी’च्या कोठडीत न्यायालयाने ७ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या मागणीनंतर विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत वाढ केली आहे. २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मलिक यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या दिवसांमध्ये त्यांची चौकशी झाली नाही. मलिकांना कह्यात घेऊन चौकशी होणे अधिक आवश्यक आहे, असे संचालनालयाने सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ७ मार्चपर्यंत मलिक यांच्या कोठडीत वाढ केली आहे.