
पेण (जिल्हा रायगड), ३ मार्च (वार्ता.) – येथे गत वर्षापासून शिवप्रेमींनी धर्मवीर बलीदान मास पाळण्यास आरंभ केला आहे. या वर्षीही फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (३ मार्च ते १ एप्रिल २०२२) पर्यंत बलीदान मास पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील स्मारकाजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून अखंड दीप प्रज्वलित करण्यात आलेला आहे. पेण तालुक्यातील सर्व धारकरी, वारकरी, शिवभक्त यांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेणच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वहाण्यासाठी बलीदान मासात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !