तालिबानकडून महिलांनी एकट्याने विमान प्रवास करण्यावर प्रतिबंध !

भारतात शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातल्यावर ‘मुसलमान स्त्रियांच्या हक्कांवर घाला घातला’, अशी बिनबुडाची टीका करणारे भारतातील पुरो(अधो)गामी यांना ‘महिलांच्या हक्कांवर गदा आणणे; म्हणजे नक्की काय असते ?’, हे समजून घेण्यासाठी अफगाणिस्तानला पाठवा ! – संपादक  

काबुल (अफगाणिस्तान) – ऑगस्ट २०२१ मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तालिबान एकानंतर एक महिलाविरोधी निर्णय घेत आहे. आता अफगाणिस्तानातून विदेशात जाणार्‍या विमानांमध्ये महिलांना एकट्याने प्रवास करण्यावर प्रतिबंध लादण्यात आला आहे. ‘अफगाण एरलाइन्स’च्या २ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मार्च या दिवशी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या अनेक महिलांना सांगण्यात आले की, पुरुष संरक्षकाविना त्या विमानप्रवास करू शकत नाहीत. अधिकार्‍यांनी सांगितले की, हा नियम तालिबानमधील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी घोषित केला आहे. या महिलांकडे दोन देशांचे नागरिकत्व असून त्या कॅनडात असलेल्या त्यांच्या घरी परत जाण्यासाठी विमानतळावर आल्या होत्या.

काही मासांपूर्वी तालिबानने घोषणा केली होती की, ७२ किमीहून अधिक प्रवास करायचा असेल, तर पुरुष नातेवाइकाविना महिलांना प्रवास करता येणार नाही.