कर्नाटकमध्ये आता खासगी शाळामध्येही हिजाबबंदी !

कर्नाटक सरकारचा आदेश !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने आता राज्यातील खासगी शाळामध्येही परीक्षेच्या कालावधीत हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदी घातली आहे. २८ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या १० वीच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थिनींना गणवेशातच येण्याचा आदेश दिला आहे. हा नियम अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनाही लागू आहे.