(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवणार्‍या चित्रपटाला आळा घालण्यासाठी न्याययंत्रणेने हस्तक्षेप करावा !’ – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादाचे आरोप असलेल्या संघटनेला पोटशूळ !

हा चित्रपट मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवणारा नसून काश्मीरमधील आतंकवाद्यांनी धर्माच्या नावाखाली हिंदूंना कसे मारले ? हाकलून लावले आणि त्यांची क्रूरता यांवर आहे. आतंकवादाचे आरोप असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेला आतंकवाद्यांविषयी कळवळा येतो, यात नवल नाही !

पणजी – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेला पोटशूळ उठला आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून पुढील ठराव घेतले आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या नावाने चालू असलेला इस्लामविषयीचा शासनपुरस्कृत द्वेष बंद करावा. चित्रपटात ‘हिंदुत्वहिता’च्या दृष्टीने चुकीची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटामुळे मुसलमान समाजाविषयी द्वेषभावना पसरवली जात आहे. मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवणार्‍या चित्रपटाला आळा घालण्यासाठी न्याययंत्रणेने हस्तक्षेप करावा.