‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

खासदार अजमल यांची ही मागणी म्हणजे सत्य दडपण्याचाच प्रकार ! अशी असत्याची बाजू घेणारे खासदार कसा कारभार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

चित्रपट करमुक्त करा ! – भाजप चित्रपट कामगार आघाडी, सातारा

‘द कश्मीर फाइल्स’ आणि मराठी चित्रपट ‘पावनखिंड’ हे दोन्ही चित्रपट करमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी ‘भाजप चित्रपट कामगार आघाडी’च्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.

भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होणार !

बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच आवश्यकता होती का ? त्या कामांचा लोकांना लाभ झाला का ?, हे शोधण्याचे काम चौकशी समिती करेल.

सैन्य भरतीमध्ये युवकांना वयोमर्यादेत सवलत द्या ! – खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

सैन्यात जाण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी ते अपार कष्ट घेतात; मात्र कोरोनामुळे सैन्य भरतीप्रक्रिया सतत स्थगित होत आहे. परिणामी युवकांची संधी हुकत असून त्यांचा स्वप्नभंग होत आहे.

बोदाड (ता. मोरगांवग जि. यवतमाळ) येथील अंगणवाडी इमारत बांधकाम गेल्या १० वर्षांपासून अपूर्ण असल्याने गावातील मुलांना अंगणवाडी केंद्रात मिळणार्‍या सोयी उपलब्ध होत नाहीत !

शासनाचा लालफितीचा कारभार कसा चालतो याचे हे उत्तम उदाहरण आहे ! विद्यार्थी मिळणार्‍या सुविधांपासून वंचित रहातात, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेविषयी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी होते उदासीन !

भाजपचे नेते एम्.जे. अकबर यांचा आरोप
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे काँग्रेसने पहिल्यापासून कानाडोळा केला, हे उघड सत्य आहे. असा पक्ष इतिहासजमा होणे आवश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातही ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.  

सातार्‍यात अज्ञातांनी केलेल्या आक्रमणामध्ये अधिवक्त्याचा डोळा कायमस्वरूपी निकामी !

अज्ञात युवकांच्या आक्रमणात अधिवक्त्याचा डोळा निकामी होण्यापर्यंत त्यांना मारहाण होते ही घटना पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण आहे

वापी (गुजरात) येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या दोघा हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी !

इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे.