वापी (गुजरात) येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या दोघा हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर शाळेच्या प्रशासनाकडून क्षमायाचना  

  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती मिशनरी अशी कृती करण्याचे धाडस करतातच कसे ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !
  • अशा ख्रिस्ती शाळांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच त्यांना वचक बसेल !
हिंदु संघटनांचे कार्यकर्ते

वापी (गुजरात) – येथील सेंट मेरी या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळेत दोघा विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे शाळेच्या प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेले मुलांचे पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी शाळेत जाऊन यास विरोध केला. या वेळी त्यांनीही ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर शाळेच्या प्रशासनाने पालक आणि हिंदु कार्यकर्ते यांची क्षमा मागितली.

लिखित स्वरूपात क्षमायाचना

१. इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यावर शाळेच्या प्रशासनाने शाळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत त्या दोघांना गुडघ्यावर बसवून क्षमा मागण्यास भाग पाडले होते, तसेच त्यांच्याकडून लिखित स्वरूपात क्षमायाचना घेतली.

२. या घटनेविषयी येथील हिंदुत्वनिष्ठ सुशील यादव यांनी सांगितले की, अशा घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. श्रावण मासामध्ये हिंदु विद्यार्थी मनगटावर लाल दोरा बांधून शाळेत गेल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते.