लोकांच्या समस्यांविषयी कुणालाच काही पडलेले नाही ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

श्री जोतिबा देवाच्या मंदिराची चारही द्वारे उघडण्यासाठी, तसेच ‘ई-पास’ बंद होण्यासाठी आजपासून आंदोलन !

श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी शुक्रवार, ११ मार्चपासून तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी जोतिबा डोंगर येथील ग्रामस्थ, पुजारी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊनही एस्.टी. कर्मचार्‍यांच्या बंदचा तिढा सुटण्याचा निर्णय लांबणीवर !

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय १० मार्च या दिवशी विधान परिषदेत घोषित करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले होते.

विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळले !

प्रवीण चव्हाण म्हणाले की, सरकार माझे नाही. मी सरकारमध्ये सहभागी नाही. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी संबंध नाही. माझ्या संपूर्ण कार्यकाळात मी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.

मुंबईतील निवासी मालमत्तांच्या संपूर्ण मालमत्ता करमाफीचे विधेयक एकमताने संमत

मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा अल्प चटईक्षेत्र असणार्‍या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

हा हिंदुत्वाचा विजय !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.

आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले

महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचे महत्त्व बिंबवा !

अमृतालाही जिंकणार्‍या मराठी भाषेचे श्रेष्ठत्व विसरून एका परकीय भाषेच्या आहारी जाणे अयोग्य आहे. सरकारने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्याची औपचारिकता करण्यापेक्षा मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे अधिक सयुक्तिक आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ‘जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान !

श्री केरेश्वर मंदिर कारावी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आगरी रणरागिणी फाऊंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते.

दिघा (नवी मुंबई) येथे महापालिकेच्या कर्मचार्‍याला लाच घेतांना अटक !

महानगरपालिकेच्या दिघा विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश राऊत यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. लाचखोरांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली, तरच अशा गोष्टींना आळा बसेल  !