मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊनही एस्.टी. कर्मचार्‍यांच्या बंदचा तिढा सुटण्याचा निर्णय लांबणीवर !

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – एस्.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय १० मार्च या दिवशी विधान परिषदेत घोषित करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊनही वित्तविभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ही बैठक लांबणीवर गेली आहे. विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी याविषयीचा निर्णय घोषित करू, असे १० मार्च या दिवशी अनिल परब यांनी सभागृहात सांगितले. ११ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर करावयाचा असल्यामुळे वित्त विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.