‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला केला जाणारा विरोध म्हणजे हिंदूंवरील दबावतंत्रच ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते

काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्‍या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे.

भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेचा विजय निश्‍चित केला आहे ! – पंतप्रधान मोदी

भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेतील भाजपचा विजय निश्‍चित केला आहे. योगी अदित्यनाथ हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, जे उत्तरप्रदेशात सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमावर सामाजिक माध्यमांतून टीकेची झोड !

‘द काश्मीर फाइल्स’ या काश्मीरमधील हिंदूंवर आतंकवाद्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांवर आधारित चित्रपटाला या कार्यक्रमांत प्रसिद्धी देण्यास नकार दिला. त्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मोडले ३ मोठे विक्रम !

योगी आदित्यनाथ सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. एकूणच उत्तरप्रदेश राज्याच्या इतिहासात सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनणारे योगी आदित्यनाथ पाचवे मुख्यमंत्री असणार आहेत.

चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

भारतात राष्ट्रभक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास राष्ट्रविरोधक एकत्र येतात. कुठे ‘मॉब लिंचिंग’ झाल्यास साम्यवादी आणि तथाकथित बुद्धीजीवी एकवटतात; पण हिंदु पंडितांचा मोठा नरसंहार होऊनही साम्यवाद्यांनी अश्रू ढाळले नाहीत किंवा सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले नाहीत.

भूमी अभिलेख अधिकार्‍यांच्या सहकार्याने मालवण आणि करंगळ भागांत अवैध बंगले आणि मदरसे उभे राहिले ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

१०२ खोटे नकाशे सिद्ध करणे ही गंभीर गोष्ट असून वास्तविक त्यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे ! शासकीय विभागात प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचार कसा मुरला आहे, हेच यावरून स्पष्ट होते !

कोरोनाच्या काळात भरलेल्या ४०० कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करणार ! – अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त

मार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण मिळायला लागले. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेने आरोग्य विभागात १ सहस्र ९११ जणांची तात्पुरती भरती केली.

अवैध पद्धतीने होणार्‍या गौण उत्खननाचे अन्वेषण करू ! – अब्दुल सत्तार, राज्यमंत्री

संगमनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील आंबी-दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असून या गावातील ग्रामस्थांना ७/१२ चा उतारा, तसेच अन्य कागदपत्र यांसाठी अन्य गावात जावे लागते, त्याचप्रकारे या परिसरात अवैध पद्धतीने गौण उत्खनन चालू आहे

२०-४० मुडदे पडले, तरी मुंबईतील झोपडपट्टी हटवू शकत नाही ! – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

८ मार्च या दिवशी अर्ध्या घंट्याच्या चर्चेच्या अंतर्गत शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर आव्हाड यांनी वरील वक्तव्य केले.

कर्नाटकच्या शासकीय धान्य योजनेतील तांदुळाची आफ्रिकेमधील देशांमध्ये विक्री !

गुन्हे नोंद करून न थांबता लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तांदुळाची अशाप्रकारे अवैध विक्री होते, तर यावर कुणाचा अंकुश कसा नाही ?