लाचखोरांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली, तरच अशा गोष्टींना आळा बसेल ! – संपादक
नवी मुंबई – महानगरपालिकेच्या दिघा विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश राऊत यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. राऊत हे अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत.
चायनीज विक्रेत्याकडे राऊत यांनी ७ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी त्यांपैकी २ सहस्र रुपये ४ दिवसांपूर्वी विक्रेत्याकडून घेतले होते. त्यानंतर विक्रेत्याने याविषयी लाचलुचपत विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार १० मार्च या दिवशी पोलिसांनी दिघा कार्यालयामध्ये सापळा रचून लाच घेतांना राऊत यांना अटक केली.