नवी देहली – भारत औषध नियंत्रक (डीसीजीआय) विभागाने ‘भारत बायोटेक’निर्मित ‘कोव्हॅक्सिन’च्या नेझल म्हणजेच नाकावाटे घेण्याच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला तिसर्या टप्प्यातील चाचण्यांच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यांतील वैद्यकीय चाचण्या १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींवर पूर्ण झाल्या आहेत. यांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नसल्याचे आस्थापनाने म्हटले आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिली भारतीय लस आहे. ही लस कोव्हॅक्सिन लशीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्यांना वर्धक मात्रा (बूस्टर डोस) म्हणून उपलब्ध होणार आहे.
COVAXIN® (BBV152) booster dose study shows Promising Results
(भारत बायोटेक चे प्रेस रिलीझ वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
‘नेझल डोस’ हा नाकावाटे दिला जातो. यामध्ये लसीचे काही थेंब नाकामध्ये सोडले जातात आणि श्वासाद्वारे आत खेचले जातात.
(सौजन्य : Republic World)
तज्ञांच्या मते स्नायूवाटे (इंजेक्शनद्वारे) दिल्या जाणार्या लसी या कोरोनाची तीव्रता अल्प करण्यास लाभदायक असल्या, तरी पूर्णपणे प्रतिबंधात्मक नाहीत. लस घेतलेल्यांनाही पुन्हा लागण होत आहे; परंतु नाकावाटे दिली जाणारी लस ही कोरोनासारख्या विषाणूपासून प्रतिबंध करण्यास अधिक कार्यक्षम असेल.