सर्व संत आणि संघटना यांनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता ! – संतांचे सामायिक मत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघ मेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संत संपर्क अभियान !

शांभवी पीठाधीश्वर आणि संत संमेलनाचे आयोजक स्वामी आनंद स्वरूप महाराज (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – येथे होत असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून ‘संत संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत सुमेरू पीठाधीश्वर जगद्गुरु नरेंद्रगिरी सरस्वती महाराज, शांभवी पीठाधीश्वर आणि संत संमेलनाचे आयोजक स्वामी आनंद स्वरूप महाराज, काली सेनेचे अध्यक्ष स्वामी विनोदगिरीजी महाराज, उत्तराखंड येथील पूज्य स्वामी सागर सिंधू महाराज, ब्रह्मर्षि पीठाधीश्वर स्वामी ताडकेश्वर महाराज आणि ‘धर्मसंसद कोर कमिटी’चे अध्यक्ष स्वामी यतींद्रगिरीजी महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देऊन सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले.

सुमेरू पीठाधीश्वर जगद्गुरु नरेंद्रगिरी सरस्वती महाराज (उजवीकडे) यांना सनातन पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी

‘हिंदु धर्मावर होत असलेल्या संकटांना दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्र हा एकमेव उपाय आहे. या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे’, असे विचार सर्व संतांनी व्यक्त केले.

स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी सांगितले की, सनातन संस्था गेली २० वर्षे हिंदु राष्ट्रासाठी पुष्कळ चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. मी तुमच्या आश्रमात अनेकदा गेलो आहे.