राधानगरी प्रांताधिकारी (जिल्हा कोल्हापूर) प्रसेनजित प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांना लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा दिल्याविना इतरांना जरब बसणार नाही !

नागपूर ग्रामीण भागात शाळांतील ५५१ शिक्षकांची पदे रिक्त !

या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून शेजारील केंद्रातील शाळेतील शिक्षकांना प्रतिदिन पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कारभार चालू आहे, तसेच दिवसेंदिवस या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय अशी होत आहे.

कोल्हापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकाच वेळी १० ठिकाणी संचलने !

या वेळी ‘लस घेऊया’, ‘मास्क वापरूया’, ‘कोरोनावर मात करूया’, असे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ‘सर्व नागरिकांनी लस घ्यावी, मास्क आणि कोरोना नियम काटेकोर पाळावेत’, असे आवाहन यावेळी केले.

श्री महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे आजपासून प्रत्येक घंट्याला ४०० भाविकांनाच दर्शन !

मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत खुले असून ही सुविधा ‘ऑनलाईन बुकींग’ केलेल्यांनाच मिळणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

श्री चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी चालू असलेले शेरे हद्दीतील खडीक्रशर आणि उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करा !

डोंगर पोखरला गेल्याने डोंगराची अवस्था पहावत नाही. या उत्खननामुळे मंदिरातील खांबांना तडे गेले असून मंदिराच्या मंडपालाही धोका निर्माण झाला आहे.

आंदोलनानंतर तिलारी धरणाच्या रखडलेल्या कालव्याच्या कामाला ओटवणे येथे प्रारंभ 

इन्सुली गावातून तिलारी धरणाचे पाणी प्रवाहित करणार्‍या कालव्याचे काम गेली कित्येक वर्षे बंद होते. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते.

कुणकेरी गावातील रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांचे तिसर्‍यांदा आंदोलन चालू

सतत मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसेल, तर शासन ग्रामस्थांनी कायदा हातात घ्यावा, याची वाट पहात आहे का ? कि ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे ?

‘हिंदूंना नियम, तर धर्मांधांना मोकळीक’, हे जाणा !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात पुणे येथील लोहगडावर पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच विनाअनुमती उरूस साजरा करण्याची जय्यत सिद्धता चालू आहे.

रसिका-आसिफ विवाह प्रकरणामुळे पुन्हा ‘लव्ह जिहाद’ची चर्चा !

‘विवाहाला बच्चू कडू उपस्थित होते कि नाही, ते ‘बँड’च्या तालावर नाचले कि नाही’, हे काही समजले नाही; मात्र या जगात ‘काही जणांसाठी जी घटना विषादाची (दुःखाची) असू शकते, त्याच वेळी काही जणांसाठी ती आनंदाने नाचण्याचीही असू शकते’, हे विशेष !

कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते आणि उद्योजक, कर्नाटक

हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते.