रसिका-आसिफ विवाह प्रकरणामुळे पुन्हा ‘लव्ह जिहाद’ची चर्चा !

नाशिक येथील एका श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक आसिफ याच्याशी झाला. विशेष म्हणजे मुलीच्या वडिलांनी जाहीरपणे थाटामाटात हा विवाह लावून दिला. त्यामुळे एक प्रकारे हिंदु-मुसलमान आंतरधर्मीय विवाहाला उघडपणे मान्यता दिल्याप्रमाणे झाले.  ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो’ या म्हणीप्रमाणे हिंदु-मुसलमान विवाहाची उघडपणे पद्धत निर्माण होण्यास यामुळे चालना मिळू शकते. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’, हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !   

 (भाग १)

लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ

रसिका-आसिफ विवाह

नाशिकमधील श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह १८ जुलै २०२१ या दिवशी आसिफ या मुसलमान तरुणाशी होणार होता. रसिका हिला आसिफ शिकवण्यासाठी घरी येत होता. तेव्हा त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाला दोघांच्याही घरच्यांची संमती होती. (कदाचित् मुलीकडून ती नाईलाजानेही असू शकते.) रसिकाच्या वडिलांना हा विवाह सार्वजनिकरीत्या आणि धुमधडाक्याने करण्याची इच्छा झाली अन् त्यांनी विवाहाच्या पत्रिका छापून त्या वाटल्या. ‘व्हॉट्सॲप’वरही ही पत्रिका पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती.

रसिका आणि आसिफ यांच्या विवाहाची पत्रिका

रसिका आणि आसिफ यांची लग्नपत्रिका प्रसारित होताच मुलीच्या समाजबांधवांत अन् एकूणच हिंदु समाजात प्रचंड खळबळ उडाली. या विवाहाला प्रखर विरोध झाला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबाने हा सार्वजनिक विवाह सोहळा प्रथम रहित केला. नंतर पुढार्‍यांनी पाठिंबा दिल्यावर २२ जुलै २०२१ या दिवशी तो जाहीररित्या करण्यात आला; परंतु हा विवाह जाहीररित्या होण्यापूर्वी नोंदणी पद्धतीने (२१ मे २०२१ या दिवशी) झालेला होता.

शंकर गो. पांडे

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून विवाहाला पाठिंबा आणि विरोध करणार्‍यांना चेतावणी !

रसिका आणि आसिफ यांच्या सोबत राज्यमंत्री बच्चू कडू

महाविकास आघाडीतील महिला आणि बाल कल्याण खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र मुलीच्या कुटुंबियांची अगत्याने भेट घेतली आणि या आंतरधर्मीय विवाहाला भक्कम पाठिंबाही दिला. त्यांनी या विवाहाप्रसंगी २ दिवस नाशिक येथे स्वतः उपस्थित राहून विवाहात नाचायचीही सिद्धता दर्शवली होती. त्याच वेळेस या विवाहास विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची चेतावणी देण्यासही ते विसरले नाहीत. (‘शासनकर्ता कसा ‘धर्मनिरपेक्ष’ असावा’, याचा बच्चू कडू यांनी जणू वस्तूपाठच जनतेला शिकवला होता.) त्यानंतर रसिका आणि आसिफ यांचा विवाह जाहीररित्या झाला. ‘विवाहाला बच्चू कडू उपस्थित होते कि नाही, ते ‘बँड’च्या तालावर नाचले कि नाही’, हे काही समजले नाही; मात्र या जगात ‘काही जणांसाठी जी घटना विषादाची (दुःखाची) असू शकते, त्याच वेळी काही जणांसाठी ती आनंदाने नाचण्याचीही असू शकते’, हे विशेष !

प्रसारमाध्यमांकडून विवाहाचे समर्थन आणि विवाहाला विरोध करणार्‍यांवर टीका !

अनेक वृत्तवाहिन्यांनी ही वार्ता मोठ्या सविस्तरपणे रंगवून सांगितली. अनेक वृत्तपत्रांनीही या विवाहाचे तावातावाने समर्थन करून हिंदूंना झोडपून काढण्याची संधी सोडली नाही. वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांच्या निवेदनातून तर ‘धार्मिक कट्टरतावाद्यांचे, म्हणजे अर्थात् हिंदूंचे ‘नाक कसे ठेचले गेले’, याचा आनंद ओसंडून वहात होता. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार नसून दोन भिन्न धर्मीय प्रेमिकांनी परस्परांवरील निःस्वार्थ  प्रेमातून अन् तेही दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा प्रकार आहे’, हे आवर्जून पटवून दिले जात होते; पण ‘धार्मिक कट्टरतावाद्यांनी (म्हणजे लव्ह जिहादला विरोध करणार्‍या हिंदूंनी) या विवाहाला विनाकारण ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप देऊन समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला’, असा आरोपही बहुतांश वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांतून करण्यात आला.

विवाहाला विरोध करणार्‍यांवर अंनिसने कायदेशीर कारवाईची मागणी करणे आणि निधर्मी हिंदूंनीच सहिष्णू हिंदूंना धार्मिक कट्टरतावादी ठरवणे !

अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी, तर एक पाऊल पुढे टाकत ‘या विवाहाला विरोध करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एका विशिष्ट समाजाला आतंकवादी वृत्तीचे असूनही आतंकवादी ठरवणे राजकीय नेत्यांना अडचणीचे झाले होते; म्हणून यापूर्वी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी अनेक षड्यंत्रे रचली गेली. ‘आतंकवादाला रंग नसतो’, हे पटवून देता देता ‘भगवा आतंकवाद’ या अभिनव शब्दाचा शोधही लावण्यात आला ! आता या विवाहाच्या निमित्ताने जगात सर्वांत अधिक सहिष्णू असणार्‍या हिंदु समाजावर ‘धार्मिक कट्टरतावादी’ असा ठपकाही ठेवण्यात आला. यात हिंदूच आघाडीवर होते आणि हिंदूंनाच याचा आसुरी आनंद होत होता, हे विशेष !

रसिकाशी विवाह करण्यास कुणी सिद्ध नसणे किंवा तिने प्रेमसंबंधांमुळे अन्य स्थळे नाकारणे यातील खरे-खोटे समजू न शकणे

एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार रसिका पायाने थोडीशी दिव्यांग असल्यामुळे तिच्याशी विवाह करण्यास हिंदु समाजातील कुणीच तरुण सिद्ध नव्हते; पण ‘आसिफने कोणत्याही अटींविना रसिकाशी विवाह करण्याची सिद्धता दर्शवल्यामुळे आम्ही विवाहास संमती दिली’, असे रसिकाच्या वडिलांचे म्हणणे होते, तर दुसर्‍या एका वृत्तानुसार त्यांच्या समाजबांधवांचे म्हणणे होते, ‘रसिकाचे गेल्या १० वर्षांपासून आसिफशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे ती समाजातील अनेक स्थळे नाकारत होती.’ यात खरे कोण आणि खोटे कोण, हे तो ईश्वरच जाणे.

वर्ष ७१२ मध्ये महंमद बीन कासीमने दाहीर राजाच्या मुलींसह सहस्रो हिंदु स्त्रियांना पळवणे आणि तेव्हापासूनच भारतात हिंदु स्त्रियांच्या लुटीचा प्रकार चालू होणे

रसिका आणि आसिफ यांचा झालेला विवाह प्रेमविवाह होता कि लव्ह जिहादचा प्रकार होता ? हे कालांतराने लक्षात येईलच; पण भारतात लव्ह जिहादचा प्रकार निःसंशयपणे अन् तोही प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, याविषयी वाद असूच शकत नाही. विशेष म्हणजे भारतात चालू असलेला लव्ह जिहाद आजचा नाही. मुसलमान आक्रमकांनी जेव्हापासून भारतावर आक्रमण करणे चालू केले, तेव्हापासूनच या लव्ह जिहादचा आरंभ झाला; फक्त त्या वेळी त्याचे स्वरूप वेगळे होते. वर्ष ७१२ मध्ये अफगाणी लुटारू महंमद बीन कासीमने भारतावर पहिले आक्रमण केले. येथूनच मग पुढे भारतावर आक्रमण करणार्‍या मुसलमान आक्रमकांची परंपरा चालू झाली. महंमद बीन कासीमशी झालेल्या लढाईत सिंधप्रांताचा हिंदु राजा दाहीर याचा पराभव झाला. त्यानंतर महंमदने त्याच्या पंथाच्या आज्ञेनुसार त्याच्यासमवेत अगणित सोने, चांदी, हिरे, माणके या लुटीसमवेत काफिरांच्या स्त्रिया आणि मुले यांची लूट (म्हणजे अरबी भाषेत ‘घनीमह’) केली आणि त्याचे वाटप (म्हणजे अरबी भाषेत ‘खैम्स’) केले. महंमद बीन कासीमने हिंदूंच्या लक्षावधी स्त्रियांनाही त्याच्यासमवेत नेले आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांची विक्री केली. दाहीर राजाच्या दोन सुंदर मुलीही त्याच्या हाती लागल्या. त्या त्याने त्याचे सर्वाेच्च पंथप्रमुख असणार्‍या खलिफाला भेटवस्तू म्हणून दिल्या. तेव्हापासून हा हिंदु स्त्रियांच्या लुटीचा घृणास्पद प्रकार या देशात चालू झाला. त्यानंतर भारतावर आक्रमणे करणार्‍या महंमद गजनी, अल्लाउद्दीन खिलजी इत्यादी सर्व परकीय आक्रमकांनी हीच परंपरा पुढे चालवली. पुढे भारतात स्थायिक झालेल्या सर्व परकीय आक्रमकांनी सुद्धा हिंदु स्त्रियांना ‘लुटीची संपत्ती’ समजून त्यांची यथेच्छ लूट केली.


हे पण वाचा –

‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन

लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां

लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !

‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण

हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad


हिंदु स्त्रियांकडे पहाण्याच्या मानसिकतेत पूर्वीच्या आणि आताच्या मुसलमानांमध्ये कोणताच भेद नसणे !

पूर्वीच्या आणि आताच्या मुसलमानांचा हिंदु स्त्रियांकडे पहाण्याच्या मानसिकतेमध्ये कोणताच पालट झालेला नाही. पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या मुसलमान देशांत, तर आजही हवी ती हिंदु मुलगी घरातून ओढून नेतात आणि तिचे धर्मपरिवर्तन करून तिच्याशी निकाह (लग्न) लावला जातो; पण बहुतेक हिंदू गार्‍हाणे (तक्रार) करण्याचे धाडसही करत नाहीत आणि एखाद्याने ते केले, तरी तेथील शासन, प्रशासन लक्षही देत नाही. मुसलमान देशांतील लव्ह जिहादला आळा घालणे कठीण असले, तरी ‘भारतासारख्या हिंदूबहुल राष्ट्रातही हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या चालू असणे’, ही गोष्ट जेवढी संतापजनक तेवढीच हिंदूंसाठी लज्जास्पदसुद्धा आहे !

(क्रमश:)