भाजपच्या पदाधिकार्याच्या हत्येच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही !
|
अलाप्पुझा (केरळ) – येथे १८ डिसेंबरच्या रात्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एस्.डी.पी.आय.चे) राज्य सचिव के.एस्. शान यांच्या हत्येच्या प्रकरणी केरळ पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसाद आणि रथीश या २ स्वयंसेवकांना अटक केली. ‘ते मन्ननचेरी गावातील रहिवासी असून हत्येमागील कटात त्यांची भूमिका होती आणि त्यांनी हत्येसाठी गाडीची व्यवस्था केली होती’, असा पोलिसांचा दावा आहे.
Kerala: Two RSS workers arrested in connection with murder of SDPI leader in Alappuzha https://t.co/EilTfPWGZD
— Republic (@republic) December 20, 2021
या प्रकरणी अन्य ८ जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
Kerala: BJP leader Ranjith Sreenivas hacked to death hours after SDPI leader was killed, had contested 2016 elections https://t.co/8s1lcOpVXu
— OpIndia.com (@OpIndia_com) December 19, 2021
शान यांच्या हत्येचा सूड म्हणून १९ डिसेंबरला भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. (माकपच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने अशा हत्या घडत आहेत. हे पहाता हे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ! – संपादक)