‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस

  • प्रथम मशिदींवरील ध्वनीक्षेपके बंद करून दाखवा; मग हिंदूंच्या मंदिरांवरील ध्वनीक्षेपके हिंदू स्वतःच बंद करतील, असे प्रशासनाला सर्वच हिंदूंनी ठणकावले पाहिजे, असेच या घटनेतून लक्षात येते ! – संपादक
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्याऐवजी शक्तिपीठ असणार्‍या मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याची नोटीस पाठवली जाणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिर

बनासकांठा (गुजरात) – ५१ शक्तिपिठांपैकी एक असणार्‍या येथील अंबाजी मंदिरातील हवनशाळेवर लावण्यात आलेले ध्वनीक्षेपक काढण्याचा आदेश प्रशासनाने मागे घेतला आहे. ‘ध्वनीप्रदूषण होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने ध्वनीक्षेपक काढावेत’, अशी नोटीस प्रशासनाने पाठवली होती; मात्र कच्छ संत समाजाचे अध्यक्ष योगी देवनाथ यांनी दिलेल्या चेतावणीनंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. योगी देवनाथ यांनी प्रशासनाने पाठवलेल्या पत्रासह ट्वीट करून म्हटले होते, ‘जर प्रशासन हा आदेश मागे घेणार नसेल, तर गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील.’

मंदिराच्या हवनशाळेमध्ये १४ ठिकाणी यज्ञ आणि हवन केले जातात. ‘एकाच वेळी अनेक ठिकाणी यज्ञ आणि हवन चालू असल्याने त्यांच्या आवाजामुळे त्रास होत आहे’, असे लोकांचे म्हणणे असल्याचे प्रशासनाने म्हटले होते.