आतापर्यंत १२ कार्यक्रम रहित
|
मुंबई – येथे काँग्रेसच्या साहाय्याने हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्या मुनावर फारुकी याच्या कार्यक्रमाचे १८ डिसेंबर या दिवशी वायबी चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसची शाखा असलेल्या ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस’ने याविषयी ‘ट्विटर’वर माहिती दिली. ‘मुक्त संभाषण म्हणून त्याने हिंदूंच्या देवतांचे विडंबन केले’, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. (हिंदूंच्या देवतांची टिंगल करणार्याची उघडउघड पाठराखण करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस ! – संपादक)
We facilitated #MunawarFaruqui’s performance in Mumbai yesterday.
Artists should have creative freedom as long as they abide by the constitution & respect all faiths.
We may disagree with someone’s content but using force to impose our opinion on others is unconstitutional. https://t.co/gx4rP7naUE pic.twitter.com/sz2vd36AUE
— AIPC – Maharashtra (@AIPCMaha) December 19, 2021
फारुकीचा पुढील कार्यक्रम जानेवारी २०२२ मध्ये कोलकाता येथे होणार आहे. त्यासाठीची तिकीट विक्रीही चालू करण्यात आली आहे. तिकिटाचे मूल्य ७९९ रुपये इतके आहे. (कोलकाता येथे होणार असलेला फारुकी याचा कार्यक्रम रहित होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – संपादक)
कॉन्ग्रेस पार्टी ने मुंबई में आयोजित करवाया हिंदू देवी-देवताओं का मजाक बनाने वाले मुनव्वर फारुकी का कॉमेडी शो, ‘फ्री स्पीच’ का बहाना#MunawarFaruqui #Mumbai #Congresshttps://t.co/UOv7Vc4viJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 19, 2021
याआधी फारुकी याचा बेंगळुरू येथे होणार असलेला कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर रहित करण्यात आला होता. आतापर्यंत त्याचे १२ कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. इंदूर येथे त्याच्या विरोधात एक तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.