काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांविषयी पाकिस्तानने हस्तक्षेप करू नये, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अफगाणिस्तानचा प्रतिनिधी म्हणून बोलणे बंद करावे, अशी चेतावणी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिली आहे. इम्रान खान यांनी इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत ‘जर अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारची आतंकवादाशी लढण्याची क्षमता नसेल, तर इस्लामिक स्टेट एक धोका म्हणून समोर येईल. सध्या अफगाणिस्तान अराजकतेकडे वाटचाल करत आहे,’ असे म्हटल्याने करझाई यांनी खान यांना चेतावणी दिली.
Hamid Karzai slams Pak propaganda, asks Imran Khan to ‘not interfere in Afghan affairs’ https://t.co/Ir73Ez1ggp
— Republic (@republic) December 20, 2021
करझाई यांनी पुढे म्हटले की, इस्लामिक स्टेट आधीपासूनच पाकिस्तानमधून अफगाणिस्तानला धमकी देत आला आहे. आता अफगाणिस्तानविषयी पाकने केलेले विधान एक दिखाऊपणा आहे. अशा प्रकारची पाकची विधाने अफगाणिस्तानच्या लोकांचा अवमान करणारी आहे.