कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑस्ट्रियामध्ये पुन्हा दळणवळण बंदी लागू

जर्मनीही दळणवळण बंदीच्या सिद्धतेत

ऑस्ट्रियन चांसलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग एका कोरोनाव्हायरस बैठकीत (क्रेडिट: ड्रॅगन टॅटिक)

नवी देहली – युरोप पुन्हा कोरोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातील एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास अर्धी रुग्णसंख्या, तसेच मृत्यू युरोपमधील आहेत. कोरोना संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत नेले आहे. आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन यांनी चेतावणी दिला आहे की, केवळ लसीकरणाने प्रकरणांची संख्या अल्प होणार नाही.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे ऑस्ट्रियाने पूर्ण दळणवळण बंदी लागू करण्यास प्रारंभ केला आहे, तर नेदरलँड्समध्ये आंशिक दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया या देशांच्या काही भागांमध्ये लसीकरण न केलेल्या लोकांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.