पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांचे उत्तम व्यंगचित्र काढून श्रद्धांजली वाहिली. या पार्श्वभूमीवर मनसेने बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी किल्ल्यांवर विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा चालू होती; मात्र मनसेने हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी गडकिल्ल्यांवर विसर्जन करण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कराव्यात, असे ट्वीट वरपे यांनी केले होते. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून खुलासा केला आहे. गडकिल्ल्यांची इतकी काळजी वाटते, तर ‘परमिट रूम’, लॉज आणि मद्याच्या दुकानांना असलेली किल्ल्यांची नावे पालटण्यासाठी तुमची मर्दुमकी दाखवा.
काही ठराविक लोकांना आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची काळजी आहे असं नुसतं दाखवायचं असतं, त्यांनी कितीतरी परमिट रूमला, लॉजला, दारूच्या दुकानांनाही छत्रपतींनी मोठ्या कष्टाने तयार केलेल्या किल्यांची नावे आहेत तिकडे मर्दुमकी दाखवावी ना.
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) November 16, 2021