पाकमधील बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा असणारा कायदा अवघ्या २४ घंट्यांत रहित !

सरकारी संस्था ‘काऊंसिल ऑफ इस्लामिक आयडियोलॉजी’च्या विरोधाचा परिणाम

इस्लाममध्ये दोषीला थेट ठार मारण्याची कठोर शिक्षा असतांना या शिक्षेला विरोध अनाकलनीय ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक सरकारने बलात्कार्‍यांना नपुंसक बनवण्याचा केलेला कायदा अवघ्या २४ घंट्यांत रहित केला. पाकिस्तानच्या ‘काऊंसिल ऑफ इस्लामिक आयडियोलॉजी’ने (‘सी.आय.आय.’ने) या शिक्षेवर आक्षेप घेऊन तिला इस्लामविरोधी ठरवल्यानंतर कट्टरतावाद्यांच्या दाबावामुळे सरकारने हा कायदा रहित केला. ‘सी.आय.आय.’ ही संस्था पाक सरकारचा भाग आहे. ही संस्था पाकच्या संसदेला इस्लामी सूत्रांविषयी सल्ले देते. कायदा आणि न्याय यांसंदर्भातील संसदीय सचिव मलिका बोखारी यांनी सांगितले की, ‘सी.आय.आय.’ने आक्षेप घेतल्यानंतर हा कायदा हटवण्यात आला आहे.

१. पाकने जरी हा कायदा रहित केला असला, तरी अन्य इस्लामी देशांमध्ये याहून कठोर शिक्षा देण्यात येते. सौदी अरेबियामध्ये बलात्कार्‍यांना चौकामध्ये उभे करून तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला जातो, तसेच दगड मारून किंवा फाशी देऊनही त्याला मारले जाते.

२. इराकमध्ये बलात्कार्‍यांना दगड मारून ठार मारले जाते.

३. उत्तर कोरियामध्ये बलात्कार्‍यांना भर चौकात गोळ्या झाडून ठार मारले जाते.