लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना यांच्याशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्यास ब्रिटिश सरकारचा नकार

  • कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी केले ६ कोटी रुपये खर्च

  • भारताच्या फाळणीशी संबंधित कागदपत्रे असल्याने गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न

‘भारताच्या फाळणीशी संबंधित कागदपत्रे भारतात आणून सत्य जनतेपुढे ठेवावे’, असे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या ७४ वर्षांतील एकाही सरकारला कधी वाटले नाही कि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले नाहीत, हे लक्षात घ्या ! जनतेनेच आता ही कागपत्रे आणण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे !

लॉर्ड माऊंटबॅटनची डायरी अनेक गुपिते उघड करू शकते.

लंडन (ब्रिटन) – इंग्रजांच्या काळात भारताचे गर्व्हनर लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना माउंटबॅटन यांच्या संदर्भातील कागदपत्रे अन् पत्रे गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटन सरकार कोट्यवधी रुपये व्यय (खर्च) करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. जर ही कादगपत्रे आणि पत्रे उघड झाली, तर भारताची फाळणी अन् एडविना यांचा संबंध समोर येईल आणि त्याचा परिणाम ब्रिटनच्या भारताशी असलेल्या संबंधांवर होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमधील लेखक अँड्यू लोनी यांनी ब्रिटिश सरकारकडे या कागदपत्रांची मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी याचिका प्रविष्ट करून काही कागदपत्रे मागितली होती. तेव्हा त्यांना ती मिळाली होती; मात्र वर्ष १९४७ – ४८ च्या काळातील कागदपत्रे त्यांना देण्यात आली नाहीत. ती कागदपत्रे लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहेत. ही कागदपत्रे सार्वजनिक होऊ नयेत, यासाठी ब्रिटिश सरकारने आतापर्यंत ६ कोटी रुपये खर्च केले आहेत.